---Advertisement---

Silent march in Navapur : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नवापूरमध्ये जमियत उलमा-ए-हिंदतर्फे मूक मोर्चा

Silent march in Navapur
---Advertisement---

Silent march in Navapur : काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नवापूर येथे जमियत उलमा-ए-हिंद (महाराष्ट्र) शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदारांना, सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जाहीर निवेदन देण्यात आले.

हिंदू बांधवांना अशा भ्याड हल्ल्याच्या माध्यमातून मारण्यात आल्याने प्रचंड निषेध व्यक्त करत संपूर्ण गावातून गांधी पुतळ्यापासून लाईट बाजाराच्या मधून,आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालय पर्यंत हा मूक मोर्चा मार्गक्रमण करण्यात आला. सुमारे दीडशे ते दोनशे मुस्लिम बांधव आणि युवकांनी एकत्र येऊन मूक मोर्चा काढत शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त केला.

मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर करून हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्यांदा हिंदू बांधव यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निघालेला हा मुस्लिम बांधवांचा मोर्चा सामाजिक एकतेचे प्रतीक दाखवून गेला.

हिंदू मुस्लिम हा भेदभाव न करता ही घटना मानव जातीला कलंक असल्याच्या तीव्र भावना मुस्लिम बांधवांनी यावेळी व्यक्त केल्या. यानंतर कुठल्याही आमिषाला बळी न पडता हिंदू मुस्लिम हे वेगवेगळे नसून मानव आपली जात आहे आणि मानवता हा धर्म आहे या विचाराने संपूर्ण नवापूर शहर हे एकोप्याने यापुढे राहील असा आत्मविश्वास सर्व मुस्लिम युवकांनी याप्रसंगी दाखवला याबद्दल संपूर्ण नवापूर शहरातून आयोजकांची कौतुक होत आहे. मुस्लिम बांधवांनी काढलेला मूक मोर्चा हा हिंदू बांधवांसाठी गर्व असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसत होत्या.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment