---Advertisement---

Gold Rate : सोने खरेदीचा प्लॅन करताय ? थांबा, आधी जाणून घ्या दर

---Advertisement---

जळगाव : सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. कारण जळगावच्या सुवर्णपेठेत चांदी दरात तब्बल ४००० रुपयांनी, तर सोने दरात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.

जळगाव सुवर्णपेठेत गुरुवारी (५ जून) रोजी झालेल्या दरवाढीनंतर चांदीने १,०८,१५० रुपये किलोचा टप्पा गाठून आजपर्यंतचा उच्चांक गाठला तर सोने दरात ९०० रुपयांनी वाढ होऊन, लाखांवर (१,०१,१४६ रुपये प्रति तोळा) पोहोचले आहे.

दरम्यान, बुधवारी चांदी १०४०३० रुपये किलो, तर सोने दर १००२१९ रुपये होते. गेल्या वर्षी (३० ऑक्टोबर २०२४ ) चांदी १०३००० रुपये किलोच्या उच्चांकावर होती. सोन्याने आधीच (२२ एप्रिल २०२५) १०१९७० रुपये तोळ्याचा विक्रमी दर गाठला आहे.

यंदा चांदी (१ जानेवारी २०२५ ) पासून ते आतापर्यंत ९०६४० रुपये प्रतिकिलोवरून १७५१० रुपयांनी वाढून १०८१५० रुपये झाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७९२०७ रुपयांवरून २१९३९ रुपयांनी वाढून १०११४६ रुपये झाली आहे.

चैनीसाठी मुलाने चोरले अठरा तोळे दागिने

कोल्हापूर : दहावीत शिकणाऱ्या मुलाने शेजारच्या घरातून साडेअठरा तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून मौजमजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील साडेअठरा तोळे सोने आणि २९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment