---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुसाट भाव वाढ होत असलेल्या चांदीच्या भाववाढीला १२ दिवसांनंतर ‘ब्रेक’ लागला आहे. त्यात थेट १० हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ८५ हजार रुपयांवर आली आहे. दुसरीकडे सोन्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २७हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.
मंगळवारी एकाच दिवसात थेट १५ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचली होती. एकाच दिवसातील एवढ्या मोठ्या भाववाढीनंतर दुसऱ्याच दिवशी मोठी घसरणही झाली आहे.
नियमित भाववाढीपेक्षा मोठी भाववाढ झाल्याने चांदीचे भाव स्थिरावण्याच्या दृष्टीने ही घसरण असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जळगाव सुवर्णपेठेत चांदी १० हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ८५ हजार रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २७हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.
बातमी अपडेट होत आहे