Gold-Silver Rate : चांदी भाववाढीसह उच्चांकावर, सोने दरात वाढ की घसरण ? जाणून घ्या

जळगाव : चांदीच्या भावात १५०० रुपयांची वाढ झाली असून, ती एक लाख १० हजार रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे. तर सोने भावातही २०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.

१४ ते १६ जून या तीन दिवसांत एक लाख सात हजार ५०० रुपयांवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात मंगळवारी एक हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख आठ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर बुधवारीदेखील भाववाढ कायम राहिली.

चांदीचे भाव पाहिले तर दोन आठवड्यांत त्यात १२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. २ जून रोजी चांदी ९८ हजार रुपयांवर होती. त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन ती १८ जूनपर्यंत एक लाख १० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.

आणि आणखी एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख १० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा हा नवा विक्रमी भाव आहे. एक किलो चांदीसाठी आता जीएसटीसह एक लाख १३ हजार ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.

दुसरीकडे, मंगळवारी ९९ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात बुधवारी सकाळी १०० रुपयांची घसरण होऊन ९९ हजार २०० रुपयांवर आला. दुपारी त्यात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

दरम्यान, चांदीच्या भावात १५०० रुपयांची वाढ झाली असून, ती एक लाख १० हजार रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे. तर सोने भावातही २०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment