---Advertisement---
जळगाव : चांदीच्या भावात मोठी वाढ सुरूच असून पुन्हा दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख १२ हजार ५०० रुपयांवर पोहचले. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ९८ हजार १०० रुपयांवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने चांदीच्या भावात अधिक वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या भावात दररोज भाववाढ होत आहे. चांदीच्या भावात १० जुलै रोजी एक हजार, ११ जुलै रोजी १५०० व आता १२ जुलै रोजी दोन हजार रुपयांची वाढ नोंदविली गेली.
त्यामुळे चांदीला नवीन चकाकी मिळून ती एक लाख १२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो अशा उच्चांकी भावावर पोहचली आहे. जीएसटीसह चांदीचा भाव एक लाख १५ हजार ८७५ रुपये झाला आहे.
सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ९८ हजार १०० रुपयांवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने चांदीच्या भावात अधिक वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चांदीत तीन दिवसांत ४५०० रुपयांची वाढ
९ जुलै १०८०००
१० जुलै १०९०००
११ जुलै ११०५००
१२ जुलै ११२५००