पहूर : तांबा-पितळाची भांडी चमकावल्यानंतर विश्वास संपादन करून चांदीच्या दागिण्यांना उजळण्याच्या बहाण्याने तालुक्यातील वसंत नगरात सात जणांना सुमारे 20 हजारांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पहूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा परप्रांतीय भामट्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. बबलू अबुल मिया (33) आणि मोहंमद शहनशा मोहमंद सादीक (23, गोपालपूर, जि.भागलपूर, बिहार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अशी घडली घटना
जामनेर तालुक्यातील वसंत नगर गावात 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तांबे, पितळ व दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदार भिमाबाई प्रभाकर इंगळे (60, वसंतनगर) या वृद्धेचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील तांब्याच्या हंड्याला चमकवून देण्यात आले व नंतर चांदीचे दागिणेही पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील चांदीच्या पाटल्या व कढे यांची पॉलिश करण्यात आली मात्र 132 ग्रॅम चांदी कमी भरल्याने पाच हजारांचे नुकसान झाले. याच पद्धत्तीने तुकाराम चव्हाण, जमुनाबाई ज्योतीराम चव्हाण, छायाबाई लखीचंद चव्हाण, जबरीबाई पंडीत चव्हाण, मिराबाई गोविंदा राठोड आणि कलाबाई खुशालसिंग राठोड यांच्याकडील दागिण्यांमध्येही काहीतरी केमिकल टाकून आरोपींनी चांदी चोरली व काही वेळेत हा प्रकार लक्षात आल्यानंतन नागरीकांनी पहूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
दोघा आरोपींना केली अटक
पहूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत बबलू अबुल मिया (33) आणि मोहंमद शहनशा मोहमंद सादीक (23) यांना फत्तेपूर दूरक्षेत्रातील अटक केली. ही कारवाई पहूरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे, हवालदार विनय सानप, किरण शिंपी, प्रवीण चौधरी, दिनेश मारवडकर, अरुण पाटील ,राहुल जोहरे, जिजाबराव कोकणे, गोपाल गायकवाड, अनिल राठोड आदींच्या पथकाने केली.