‘सिमी’ची पार्श्वभूमी असलेल्या जळगावकरांना बांगलादेशींची घुसघोरी परवडेल का?

---Advertisement---

 

जळगाव : एकीकडे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी व बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया, Students Islamic Movement of India ) या कट्टरवादी संघटनेची गत काळातील सावली अद्यापही जळगावकरांच्या मानसिकतेवर आहे, तर दुसरीकडे अलीकडच्या काळात वाढलेली बांगलादेशींची घुसघोरी (Bangladeshi infiltration) ही नव्या चिंतेत भर टाकत आहे. यामुळे ‘सिमी’ची पार्श्वभूमी असलेल्या जळगावकरांना बांगलादेशींची घुसघोरी परवडेल का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

साधरणतः १९९१ साली जळगावात सिमीचे नेटवर्क सक्रिय असल्याचे समोर आले होते. त्या काळी पोलीस अधीक्षक कुलवंत कुमार यांच्या नेतृत्वात सिमीवर कडक कारवाई करून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. तपासाअंती काहींची दहशतवादी कारवायांतील भूमिका स्पष्ट झाली होती. या कारवाईनंतर काही काळ सिमीचे नेटवर्क नष्ट झाल्याचे वाटले, मात्र त्यानंतरही सिमीचे अघोषित नेटवर्क अनेकवेळा उघडकीस आले होते.

आता अशातच पुन्हा ”बांगलादेशींची घुसघोरी” या नव्या समस्येने डोके वर काढले आहे. 27 मे 2025 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना (Bangladeshi women) ताब्यात घेतले. तानिया मुळशीर अहमद (वय 26, जिल्हा ढाका, बांगलादेश) व करीमा बोकूलमिया अख्तर (वय 22, बाव्हम बरिया, बांगलादेश) असे त्यांचे नाव असल्याचे त्यांनी पोलीस चौकशीत सांगितले.

जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनीत एका बांगलादेशी तरुणीला बंदिस्त ठेवून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत, असल्याची घटना 25 जुलै 2025 रोजी उघडकीस आली. यात बांगलादेशी तरुणीची सुटका, तर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या महिलेवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी दिली.

जळगावच्या एमआयडीसी परिसरातील हॉटेल तारामध्ये काही बांगलादेशी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. ही घटना 20 ऑगस्ट 2025 रोजी उघडकीस आली. हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला असता, या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला.

दरम्यान, अवघ्या तीन महिन्यांत (मे, जुलै आणि ऑगस्ट) उघडकीस आलेल्या या तीन गंभीर प्रकरणामुळे ”बांगलादेशींची घुसघोरी” उघड झालेली आहे. यामुळे ‘सिमी’ची (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया, Students Islamic Movement of India ) पार्श्वभूमी असलेल्या जळगावकरांना बांगलादेशींची घुसघोरी (Bangladeshi infiltration) परवडेल का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---