सिंपल आणि आकर्षक लुक साठी फॉलो करा ‘या’ टिप्स

तरुण भारत लाईव्ह । २७ जानेवारी २०२३। आपण सगळ्यांपेक्षा सुंदर आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असत. कोणत्याही प्रसंगाला शोभून दिसतील असे कपडे घालतो. कपड्यांवर मॅचिंग असे दागिने घालतो.ऑफीसमध्ये, एखाद्या मिटींगला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण प्रेझेंटेबल असायला हवं. तुमचा लुक सिंपल आणि आकर्षक दिसावं यासाठी तुम्ही काही टिप्स फोल्लो करू शकता.

सिंपल आणि आकर्षक लुक साठी तुम्ही लाईट कलर वापरू शकता. आपल्या कपड्यांवर ज्याप्रकारचे वर्क आहे त्या प्रकारची ज्वेलरी घातली तर आपला लूक आणखी उठून दिसतो. मोत्याचे वर्क असेल तर मोत्याचे दागिने, खड्याचे वर्क असेल तर खड्याचे सोबर दागिने उठून दिसतात. सिंपल लूकसाठी केस मोकळे सोडणे सुद्धा उत्तम पर्याय आहे. यामुळे आपला लुक आणखीनच आकर्षक दिसतो.

पायात काय घालावे असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही पायात सिंपल जुती घालू शकता. यामुळे तुमचा लुक परफेक्ट होतो. हातात एखादी छोटी सिंपल पर्स तुम्ही सोबत कॅरी करू शकता.