तरुण भारत लाईव्ह ।०३ फेब्रुवारी २०२३। चेहऱ्यावर ग्लो असण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिरम वापरतो. बाजारात विविध कंपन्यांची सिरम मिळतात. त्वचेचा ग्लो कायम ठेवण्यासाठी वापरली जाणारी ही सिरम घरच्या घरीही तयार करता येतात. हे सिरम घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
१ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध आणि १ चमचा कोरफडीचा गर एकत्र करावे. हे मिश्रणाचे ३ ते ४ ड्रॉप्स चेहऱ्यावर एकसारखे लावावेत. कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉईश्चरायजरप्रमाणे काम करत असल्याने उन्हात किंवा बाहेर जाताना त्यांचा फायदा होतो.
ज्यांची तेलकट त्वचा आहे त्यांनी १ चमचा टोमॅटो ज्यूस आणि १ चमचा मध एकत्र करा. चेहरा स्वच्छ करुन रोज सकाळी आणि संध्याकाळी सिरम लावायला हवे. पिंपल्स आणि पुटकुळ्या कमी करण्यास मधाचा चांगला उपयोग होतो.
काही जणांची त्वचा खूपच नाजूक असते यासाठी सिरम तयार करताना फक्त साखर आणि कोरं दूध यांचा वापर करावा. १ चमचा साखर घेऊन त्यात ३ चमचे दूध घालून ते एकजीव करावे आणि चेहऱ्यावर लावावे. नियमितपणे दिवसातून २ वेळा त्वचेला हलक्या हाताने सिरम लावावे. सिरममुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि त्वचा ग्लो करते.