अग्रलेख
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दुस-या स्थानावर असलेले Manish Sisodia मनीष सिसोदिया यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सायंकाळी तिहार तुरुंगातून अटक केली.
एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला तुरुंगातून अटक करण्याची देशाच्या इतिहासातील बहुधा ही पहिलीच घटना असावी. आतापर्यंत आपण अटक करून नेत्याला तुरुंगात टाकल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. पण Manish Sisodia सिसोदिया यांना तुरुंगात अटक करून तुरुंगातच ठेवण्याची ईडीची कारवाई दुर्मिळ स्वरूपाची म्हणावी लागेल. अंमलबजावणी संचालनालयाला आता अधिक तपासासाठी सिसोदिया यांची सात दिवसांची कोठडी मिळाली आहे. दिल्ली सरकारच्या बहुचर्चित उत्पादन शुल्क घोटाळ्यात सीबीआयने २६ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री असलेल्या Manish Sisodia मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. सीबीआयने त्यांची दोनदा कोठडी घेतली. त्यानंतर आम्हाला सध्यातरी Manish Sisodia सिसोदिया यांच्या कोठडीची गरज नाही; मात्र गरज पडली तर आम्ही पुन्हा त्यांची कोठडी मागू शकतो, असे सीबीआयने म्हटल्यामुळे न्यायालयाने त्यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे Manish Sisodia सिसोदिया यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात जाताना सिसोदिया यांनी भगवद्गीता आपल्यासोबत नेण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने तशी परवानगी दिलीही. पण Manish Sisodia सिसोदिया यांच्या नशिबी भगवद्गीता पठनाचे योग नव्हते. गीतेत फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहायला सांगितले आहे. पण सिसोदिया यांनी गीता उशिरा वाचायला घेतली असावी. त्यांनी फळाची अपेक्षा ठेवतच फळांच्या रसातून नको ते कर्म केले; त्याची शिक्षा त्यांना आता भोगावी लागत आहे. सिसोदिया यांनी आधीच गीता वाचली असती तर त्यांच्यावर तुरुंगात गीता घेऊन जाण्याची वेळ आली नसती. उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने तिहार तुरुंगात जाऊन सिसोदिया यांची चौकशी केली आणि त्यांना अटक केली. एकाच प्रकरणात केंद्र सरकारच्या दोन यंत्रणा Manish Sisodia सिसोदिया यांची चौकशी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यात समन्वय नाही का, असा वरकरणी कोणाचाही समज होऊ शकतो, पण प्रत्यक्षात तसे नाही. एखाद्या प्रकरणाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारस्थानाची चौकशी करण्याचा अधिकार हा CBI सीबीआयला असतो. तर, त्याच प्रकरणातील आर्थिक व्यवहाराचा विशेषत: त्यातील काळ्या पैशाचा सहभागाच्या चौकशीचा अधिकार हा ED अंमलबजावणी संचालनालयाला असतो.
सामान्यपणे सीबीआय चौकशी पोलिस चौकशीसारखी असते. उत्पादन शुल्क घोटाळ्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या षडयंत्राची तसेच त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआय करीत आहे. तर, या घोटाळ्यातून काळा पैसा कसा उभा झाला? त्याचे वाटप कसे झाले? कोणाकोणाला त्यातील वाटा मिळाला, हे अंमलबजावणी संचालनालयाला शोधायचे आहे. Manish Sisodia सिसोदिया यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने आधीच गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे या प्रकरणात सिसोदिया यांच्याविरुद्ध सीबीआयने अद्याप न्यायालयात आरोपपत्र दाखल केले नसले, तरी अटक करायच्या आधीच अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. उत्पादन शुल्क घोटाळ्यात आपचे अनेक मासे अडकले आहेत. छोट्या माशांना अटक झाली आहे. Manish Sisodia सिसोदिया यांच्या रूपात आता मध्यम स्वरूपाचा मासाही पकडला गेला आहे. आता फक्त सर्वांत मोठा मासा म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय वा ईडी कधी अटक करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. आपण कुठेही कागदोपत्री अडकणार नाही, याची पूर्ण काळजी केजरीवाल यांनी घेतली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री असतानाही केजरीवाल यांनी आपल्याकडे एकही खाते ठेवले नाही तर Manish Sisodia सिसोदिया यांच्याकडे तब्बल १८ खात्यांचा कार्यभार दिला होता. जवळपास ७० टक्के दिल्ली सरकार एकटे सिसोदियाच चालवत होते.
केजरीवाल यांनी आपल्याकडे एकही खाते न ठेवल्यामुळे कोणत्याच सरकारी फाईलवर वा कागदावर त्यांची स्वाक्षरी नसते. म्हणजे केजरीवाल यांनी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना आपल्या Manish Sisodia सहका-यांना फसवले आहे, असे म्हटले तर ते फारसे चूक ठरू नये. केजरीवाल यांच्या अनुमतीशिवाय उत्पादन शुल्क घोटाळा होऊच शकत नाही. हा घोटाळा जवळपास १०० कोटी रुपयांचा आहे, असे समजते. या घोटाळ्यातून आलेल्या पैशाच्या आधारावर आपने पंजाब आणि गुजरातसह आणखी काही राज्यांतील विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही लढत असल्याचा आव आणत आपने केलेला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार उत्पादन शुल्क घोटाळ्यातून उघड झाला आहे. दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क घोटाळ्याचे धागेदोरे खूप दूरपर्यंत म्हणजे दक्षिणेतील तेलंगणा राज्यापर्यंत पसरले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री तसेच भारत राष्ट्र समितीचे नेते चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, असा संशय आहे. त्यामुळे त्यांनाही अटक झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे आता अटकेपासून आपल्याला वाचवण्यासाठी कविता यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मागणीसाठी जंतरमंतरवर शुक्रवारी दिवसभराचे धरणे आंदोलन केले.
कविता आता महिलांच्या हिताचा आव आणत आहे, पण दिल्लीप्रमाणेच तेलंगणातही मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क घोटाळा झाला असावा, अशी शंका घ्यायला पूर्ण जागा आहे. सिसोदिया यांच्याआधी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक झाली होती. आठ महिन्यांपासून तुरुंगात असूनही जैन यांनी राजीनामा दिला नव्हता. मात्र, Manish Sisodia सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर त्यांनी आपला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्यामुळे नाईलाजाने जैन यांनाही राजीनामा द्यावा लागला. जैन आणि सिसोदिया यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील जागांवर केजरीवाल यांनी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नियुक्ती केली. आता सिसोदिया यांच्याकडील शिक्षण खाते आतिशी यांच्याकडे देण्यात आले. दिल्ली सरकारचे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आतिशी यांचा मोठा सहभाग असल्याचे म्हटले जाते. Manish Sisodia सिसोदिया शिक्षणमंत्री असताना त्यांच्या अघोषित राज्यमंत्री म्हणून आतिशीच काम करीत होत्या. आतिशी यांचा मंत्रिमंडळात समावेश करायला भाजपाने विरोध केला होता. आतिशी डाव्या विचारधारेच्या असल्याचे तसेच या विचारधारेचे लोक देशविरोधी कारस्थान करणा-यांबद्दल सहानुभूती ठेवून असतात, असा भाजपाचा आरोप होता. मात्र, भाजपाच्या आक्षेपानंतरही केजरीवाल यांनी आतिशी यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. Manish Sisodia मनीष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून दिल्लीत आमूलाग्र परिवर्तन केले. दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट केला.
दिल्लीतील सरकारी शाळा या महागड्या खाजगी शाळांसारख्या बनवल्या, असा प्रचार आपतर्फे केला जातो. Manish Sisodia त्यामुळेच सिसोदिया यांना झालेल्या अटकेनंतर आपने दिल्लीच्या शिक्षणमंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांना ओलीस धरत जो तमाशा केला, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले, हे क्षणभर मान्य केले तरी त्यामुळे त्यांनी दुस-या क्षेत्रात केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करू नये, हा कुठला न्याय आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे केजरीवाल वा Manish Sisodia सिसोदिया यांना उत्पादन शुल्क घोटाळा करण्याचा अधिकार मिळतो का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. सिसोदिया यांच्या अटकेमुळे आपण किती व्यथित झालो, हे दाखवण्यासाठी केजरीवाल यावर्षी धुळवडीला रंग खेळले नाही; एवढेच नाही तर राजघाटवर जाऊन त्यांनी मौन प्रार्थनाही केली. केजरीवाल अशी नाटके करण्यात अतिशय वस्ताद आहेत. Manish Sisodia सिसोदिया यांनी उत्पादन शुल्क घोटाळ्यात नको ते रंग उधळले नसते, तर त्यांची होळी तिहार तुरुंगात गेली नसती. त्यामुळे केजरीवाल यांनी अशी कितीही नाटके केली, जनतेची भावनिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला आता दिल्लीची जनता बळी पडणार नाही. काय खरं आहे, काय खोटं आहे, हे दिल्लीच्या जनतेला समजून चुकले आहे. तुम्ही जनतेला एकदा फसवू शकता, वारंवार फसवू शकत नाही. केजरीवाल यांनीही आता भगवद्गीता आपल्यासोबत ठेवावी; कारण कोणत्याही क्षणी त्यांना अटक झाल्यावर भगवद्गीतेअभावी तुरुंगात त्यांची गैरसोय होऊ नये, अशी दिल्लीच्याच नाही तर देशातील जनतेचीही इच्छा आहे. Manish Sisodia