Skydiving in Ayodhya : बहिणाबाईच्या पणतीचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येत स्कायडायव्हिंग

डॉ. पंकज पाटील

Skydiving in Ayodhya खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने 23 फेब्रुवारी रोजी रामजन्मभूमी तीर्थक्ष्ोत्र अयोध्येत स्कायडायव्हिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापुर्वी तीने जगप्रसिध्द अशा एवरेस्ट शिखरावर स्कायडायव्हिंग करण्याचा जागतीक विक्रम केला आहे.

रामजन्मभूमी तीर्थक्ष्ोत्रावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आगळ्या वेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यासह पर्यटकांना ीरतीय महिला कोणत्याही क्ष्ोत्रात साहस करू शकतात हे दाखवण्यासाठी पद्मश्री शीतल महाजन यांनी हे धाडस केले. हा विक्रम 22 फेब्रुवारी रोजी करण्याचे निर्धारीत केले होते. परंतु या दिवशी पाऊस पडल्याने तो एक दिवस पुढे ढकलावा लागला. 23 रोजी हवामान स्वच्छ व वाऱ्याचा वेगही योग्य असल्याने ही मोहिम फत्ते केली.

 

 अशी झाली मोहिम फत्ते

 

ही उड्डाण मोहीम प्रामुख्याने दोन भारतीय हवाई क्रीडा तज्ज्ञांनी चालवली. पॉवर हँग ग्लायडर एअर फ्लाइट ॲडव्हेंचरचे सक्रिय सदस्य तथा खासदार कीर्ती वर्धन सिंग जे अनुभवी उड्डाण तज्ञ असून त्यांनी पॅराग्लाइडर्स, पॅरा ट्राईक्स आणि पॉवर्ड हँग ग्लायडर्स उडवले आहेत. ते एक अनुभवी एरो मॉडेलर देखील आहे, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता उत्तरप्रदेशातील सरयू नदीच्या काठावरील रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र जवळून एक किलो मिटर अंतरावरून पॉवर हँग ग्लायडर पॅराशूटव्दारे नदीवरील वाळूवरील रबरी धावपट्टीवरून उड्डाण घेतले. 5 हजार फुट उंची गाठताच नऊवारी साडी परिधान केलेल् या शीतलने पॅराग्लायडर मधुन उडी घेतली. सायंकाळी 5.30 वाजता तीने शरयू नदीच्या काठावरील वाळूत पॅराशूटद्वारे लँडिंग केले.

 

खासदारांनी चालवले पॉवर हँग ग्लायडर

 

अयोध्येचे खासदार कीर्तीवर्धन सिंह यांनी अयोध्येतील श्री राम मंदिरासमोरील पॉवर हँग ग्लायडरवरून शितल महाजन हीच्यासोबत 23 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता उड्डाण केले. अयोध्येतील शरयू नदीच्या वालुकामय किनाऱ्यावर पॉवर हँग ग्लायडरवरून पॅराशूट जंप/स्कायडायव्हिंग ध्वज उडी यशस्वीरीत्या पार पडली. पॉवर हँग ग्लायडर पायलट म्हणून स्वत: खासदार कीर्तीवर्धन सिंह व खासदार गोंडा  यांनी काम केले.

 

काय होता उद्देश

 

अयोध्येच्या भूमीत येणाऱ्या सर्व भाविकांना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रात स्वागताचा संदेश देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. एरो स्पोर्ट्सच्या माध्यमातून भारतीय तरुणांमध्ये साहसाची भावना वाढवणे आणि अयोध्येचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करून आपल्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीबद्दल जागरुकता वाढवणे हा यामागचा उद्देश होता.

 

 यांचे मिळाले सहकार्य

 

हे हवाई प्रात्यक्षिक प्रत्यक्षात आणण्यासाठी अयोध्या जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार, उपजिल्हा दंडाधिकारी संदीप श्रीवास्तव, लक्ष्मण केला पोलिस स्टेशनचे प्रभारी त्रिपाठी, नया घाट पोलिस स्टेशनचे प्रभारी विजय मिश्रा, अयोध्या सर्कल इन्स्पेक्टर आशितोष, हनुमानसिंहजी पोलीस नियंत्रण कक्ष यलो झोन प्रभारी मनोज शर्मा प्रभारी तपासणी अधिकारी अयोध्या विनय सिंह असिस्टंट कमांडंट  श्री रामजन्मभूमी क्षेत्र अयोध्या, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, भारतीय विमानतळ प्राधिकरण, अयोध्या विमानतळ संचालक विनोद कुमार,  प्रभारी अजय गिरी, अवदेश कुमार सिंग उपमहाव्यवस्थापक अयोध्या विमानतळ यांचे तीला सहकार्य मिळाले.

 

अयोध्येतील हा पॉवर हँग ग्लायडर पॅराशूट जंप/स्कायडायव्हिंग प्रात्यक्षिक कार्यक्रम हवाई क्रीडापटूंसाठी प्रोत्साहन आणि स्थानिक समुदायासाठी प्रेरणादायी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. हे पॅराशूट प्रात्यक्षिक एक ऐतिहासिक घटना आहे. पहिल्यांदाच, अयोध्येतील राम मंदिराजवळ पॉवर हँग ग्लायडरमध्ये बसून पॅराशूटने उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथमच पॉवर हँग ग्लायडर उडवून पॅराशूटद्वारे अयोध्येतील राम मंदिराजवळ शरयू नदीच्या काठावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

खासदार कीर्ती वर्धन सिंग, अयोध्या

 

माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत, मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्कायडायव्हिंगच्या क्षेत्रात भारताचा गौरव करण्याचा बहुमान मिळाला आहे. 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत मला स्कायडायव्हिंग क्षेत्रात 26 राष्ट्रीय, 4 आशियाई आणि 8 जागतिक विक्रम करण्याचा मान मिळाला आहे. माझ्या देशासाठी काहीतरी खास करण्याची माझी नेहमीच तीव्र महत्त्वाकांक्षा आहे ज्यामुळे भारतीय महिलांची प्रतिमा जागतिक स्तरावर समोर येईल.

पद्मश्री शीतल महाजन, (कवयित्री बहिणाबाईं चौधरींची पणती)