धरणगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांचा विजयाात राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मोठे योगदान राहिले. या मतदारसंघात स्मिता वाघ यांना तब्बल ६३ हजार १४० मतांचा लीड दिला. बुथनिहाय आकडेवारी पाहता २ न.पांसह ८ जि.प.गट, १६ पं.स. गण, १४२ ग्रामपंचायती गुलाबराव पाटलांच्या पाठीशी उभे राहिल्याचे स्पष्ट होते.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात धरणगाव नगरपालिका व नशिराबाद नगरपरिषद हे दोन न.पा. शहरी भाग येतात. यासह ८ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समिती गणांसह १४२ ग्रामपंचायती व १८८ गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. सर्व जाती धर्माचा असलेला हा मतदार संघ गेल्या ३० वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीचा अभेद्य गड राहिला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांनी अनेकवेळा बंडखोरी केल्यानंतरही विधानसभेत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेनेचे नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुळे हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे.
मतदार संघातील ८ जि.प.च्या प्रत्येक गटात आणि १६ पंचायत समितीच्या प्रत्येक गणात महायुती मोठ्या फरकाने लीड आहे. ग्रामीण भागात महायुतीला १,०८,०३३ तर मशालला ४९,६२६ इतके मते मिळाली आहे. म्हणजे मशाल ला मिळालेल्या मतांपेक्षा ५८,४०७ जास्त मतांचा लीड युतीला आहे. शहरी भागातही ४७३३ इतका लीड असून एकूण लीड हा ६३,१४० इतका आहे. यात धरणगाव येथे 3815 तर नाशिराबाद येथे 918 मतांचा लीड आहे. एकूण १६२ गावांपैकी केवळ २० गावांमध्ये थोड्या फार महायुती फरकाने मागे आहे.
भोकर-कानळदा गटातून ८८७०, आसोदा-ममुराबाद गटातून १०,६४०, भादली-नशिराबाद गटातून २६२७, चिंचोली-शिरसोली ९६७१, म्हसावद-बोरणार ६००६, साळवा-बांभोरी बु. ३५२०, सोनवद बु.-पिंप्री खु.७९६७ तर पाळधी-बांभोरी गटातून तब्बल ९१०६ मतांचा लीड मिळाला आहे. धरणगाव शहरामध्ये बूथ क्र.१९१, १९५, १९८, १९९, २००, २०८, २१५, २१६, २१७ तर नशिराबाद शहरामध्ये बूथ क्र. १५५, १६५, १५७, १६३, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१ येथे थोडी मते कमी मिळाली आहेत. उर्वरित सर्व ठिकाणांवर मोठे मताधिक्य मिळाले आहे.