नवी दिल्ली : भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृतीला ३.४० कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतले. या लिलावानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम पेक्षास्मृती मानधनाचा पगार दुप्पट झाला आहे. बाबरच नव्हे तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, शाहिन शाह आफ्रिदी यांना मिळणारा पगार देखील भारतीय महिला क्रिकेटपटूंपेक्षा कमीच आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो सध्या पेशावर झल्मीकडून खेळतो आणि त्याला प्रत्येक हंगामात १.५० लाख डॉलर मिळत आहेत, पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३.६० कोटींच्या पुढे जाते पण भारतीय रुपयात ही रक्कम मोजली तर ती १.५० कोटींपेक्षा कमी आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये ७ खेळाडूंना २ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळाली आहे. बाबरच नव्हे तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, शाहिन शाह आफ्रिदी यांना मिळणारा पगार २ कोटींपेक्षा कमीच आहे.
महिला प्रीमिअर लीगधील महागडे खेळाडू
स्मृती मंधाना ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – ३.४० कोटी
अॅश्ली गार्डनर ( गुजरात जायंट्स ) – ३.२० कोटी
नॅट सीव्हर ( मुंबई इंडियन्स ) -३.२० कोटी
दीप्ती शर्मा ( यूपी वॉरियर्स ) – २.६० कोटी
जेमिमा रॉड्रिग्ज ( दिल्ली कॅपिटल्स) – २.२० कोटी
बेथ मूनी ( गुजरात जायंट्स) – २ कोटी
शेफाली वर्मा ( दिल्ली कॅपिटल्स) – २ कोटी