Sneha Kapure : चाळीसगावची कन्या स्नेहा कापुरे‌ ‘कौन बनेगा करोड़पति’मध्ये दिसणार!

---Advertisement---

 

चाळीसगाव : चाळीसगावची कन्या स्नेहा किशोर कापुरे ही सोनी टीव्हीवरील सुप्रसिद्ध शो ‌‘कौन बनेगा करोड़पति’मधील हॉट सीटवर दिसणार आहे.

मायानगरीतील सुपरस्टार हिरो अमिताभ बच्चन संचलित ‌‘कौन बनेगा करोड़पति’मध्ये निवड होण्यासाठी विविध चाचण्या पार करत तिने मार्गाक्रमण केले आहे.

‌‘कौन बनेगा करोड़पति’च्या सीजन 17 मध्ये चाळीसगावची स्नेहा कापुरे ही 27 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान दिसणार आहे. सध्या सोनी टीव्हीवर रात्री नऊ वाजता हा शो पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या परीक्षेद्वारा स्नेहा कापुरे हिची महिला व बालविकास विभागात सांख्यिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. सध्या ती नाशिक येथील मध्यवत कारागृहात प्रशासकीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.

अभियांत्रिकी शिक्षणासाठी ड्रीम कॉलेज म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या पुण्यातील व्हीआयटी कॉलेजमधून स्नेहा कापुरे हिने बीटेक ही पदवी मिळवली आहे.

स्नेहा कापुरे हिची ‌‘कोण बनेगा करोडपती‌’मध्ये निवड झाल्याबद्दल परिसरात अभिनंदन होत आहे. 30 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या एपिसोडमध्ये स्नेहा कापुरे ही सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देणार आहे.

चाळीसगाव येथे शिंपी काम करणारे किशोर वाल्मीक कापुरे यांची ती कन्या आहे. आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि गावाचे नाव देशपातळीवर व्हावे, यासाठी ती प्रयत्न करत आहे, असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---