..तर बस चालक-वाहकांवर होणार कारवाई, शासनाने काढले परिपत्रक, वाचा सविस्तर

bus : एसटी बसमध्ये प्रवास करत असताना अनेक बस चालक आणि वाहक अस्वच्छ गणवेश घातल्याचे आपल्याला दिसले असेलच. मात्र आता एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेशच दिला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

काय म्हटलंय महाव्यवस्थापकांनी ?
एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

मग आदेश लागू करा!

वीन गणवेश द्या नंतरच आदेश शिस्तीचा भाग म्हणून चालक वाहकांनीच नव्हे; तर प्रत्येक कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेला गणवेश घालायलाच हवा. मात्र, गणवेशच दिला नसताना तो घालून येण्याची सक्ती तसेच कारवाईचीही तंबी कशी दिली जाऊ शकते. नवीन गणवेश द्या, त्यानंतरच हा आदेश लागू करा, असे मत महाराष्ट्र  कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश हंकारे यांनी व्‍यक्‍त केले आहे.