---Advertisement---

…तर मी सुद्धा वयाच्या पन्नाशीनंतर राजकारणातून निवृत्त होईल, वाचा नक्की काय म्हणाल्या मंत्री रक्षा खडसे?

---Advertisement---

बोदवड : संस्था सुरू करणे सोपे आहे, ती टिकवून ठेवणे आणि संस्कारित विद्यार्थी घडविणे हे कठीण आहे. परंतु आपण संस्कारीत विद्यार्थी घडविले. १७ विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या संस्थेत आता एक हजार ७०० विद्यार्थी आहेत, याचा आनंद आहे. बडगुजर सर सेवानिवृत्तीनंतर आपण निरमतर सेवेचे काम सुरु ठेवाला, असा मला विश्वास आहे, असे मत मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.

बोदवड येथील राष्टीय शिक्षण संस्था संचालिक सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्ग खोल्यांचे उदघाटन व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बडगुजर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रतेक गोष्टीला मर्यादा असतात, त्याचं पालन करणे हे प्रतेकाचे कर्तव्य आहे. या शाळेतील विद्यार्थी चांगल्या क्षेत्रात काम करत आहेत. आज मला शाळेच्या अध्यक्ष अनंतराव कुळकर्णी यांचे कौतुक करावेसे वाटते, तुम्ही लावलेल्या रोपट्याच वटवृक्षात रुपांतर झाले. भविष्यातही मी मतदारसंघासाठी जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करेल. मंत्री झाल्यानंतर माझी जबाबदीरी वाढली आहे. त्यामुळे मी मतदारसंघासाठी जास्त वेळ देऊ शतक नाही. आपले सर्वाचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मला खूप विकास कामे करायची आहेत. मंत्री पद आज आहे, उद्या नसेल, याची मला जाणीव आहे. पुढच्या वेळेसही आपण मला निवडून आणाल हाही विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या.

जेव्हा आम्ही मित्रमंडळी एकत्र येतो, गमतीने गमतीने मी म्हणते, आयुष्याच्या पन्नाशी नंतर राजकारणातून स्वेच्छेने सेवानिवृत्त होईल. आज माझे वय 37 वर्ष आहे. मंत्री झाल्यापासून मला शिकायला खूप काही मिळत आहे. ज्ञानाचे भांडार देशात भरले आहे, त्याचा उपयोग आपण घ्यावा. या पुढेही संस्थेला जी मदत करता येईल, ती मी करेल, अशी ग्वाही मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

यावेळी बेटी बचाव बेटी पढाओचे राष्टीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, राष्टीय संस्थेचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी, पुरुषोत्तम गड्डम आदी उपस्थित होते. ऐनगाव हायस्कुल गजराज सिग हजारी यांनी मनोदत व्यक्त केले. कार्यक्रमाला नगरअध्यक्ष आनंदा पाटी, ऊपनगरअध्यक्ष रेखा गायकवाड, डॉ. कैलास खंडेलवाल, मिठुंशेठजी अग्रवाल, शाळेचे सर्व संचालक शिक्षक वुद व शहरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment