मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला मविआची सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळे वातावरण बिघडेल गोंधळ होईल, असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार सभा थांबवेल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसा निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री यावरती लक्ष ठेऊन आहेत. असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. त्यामुळे मविआच्या नेत्यांकडुन संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
महाजन म्हणाले, “मविआची अवस्था अत्यंत केविलवाणी झालेली आहे. केवळ मतांसाठी त्यांचे हे प्रयत्न आहेत. सभेमुळे वातावरण बिघडेल गोंधळ होईल, असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार ही ठोस भुमिका घेईल. चौकशी सुरु आहे. पोलिसांवर संपूर्ण जबाबदारी आहे. पोलिसांनी सभेस नकार दिल्यास सरकार ही योग्य तो निर्णय घेईल.” अशी भुमिका त्यांनी यावेळी मांडली.