…तर उरलीसुरली सहानुभूतीही जाईल!

 

अग्रलेख

निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ४० आमदार आणि १३ खासदार असलेल्या गटाला दिल्यापासून आधीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बावचळल्यासारखे वागत आहेत.

Shivsena Crisis त्यांना सल्ला देऊन गार करणारे संजय राऊत तर अक्षरश: बरळत आहेत. Shivsena Crisis निवडणूक आयोगाने दोन हजार कोटींचा सौदा करून निवाडा दिला, हा त्यांचा आरोप केवळ हास्यास्पदच नाही, तर एका घटनात्मक संस्थेचा अवमान करणारा, देशातल्या लोकशाहीवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावरही अविश्वास व्यक्त करणारा आहे. Shivsena Crisis कोणत्याही पुराव्यांशिवाय राऊत आरोप करीत सुटले आहेत आणि उद्धव ठाकरे व त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे टाळ्या वाजवत आहेत. Shivsena Crisis आपल्या पक्षाचे बारा वाजल्यानंतरही ठाकरे कुटुंबीय त्यातून धडा घ्यायला तयार नाहीत, हे त्या घराण्याचे दुर्दैवच! उद्धव ठाकरे जे काही बोलत आहेत, ते टोकाच्या निराशेतून बोलताहेत, हे स्पष्ट झाले आहे. Shivsena Crisis असे नसते तर त्यांनी वायफळ, निराधार बडबड केली नसती. Shivsena Crisis ते जे बोलत आहेत, ती बडबड यासाठी आहे की, त्यांच्या बोलण्यात कुठेही समंजसपणा दिसून आलेला नाही.

Shivsena Crisis एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार गुवाहाटीहून परत आल्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. त्याचवेळी विधानसभेतील आमदार आणि लोकसभेतील खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर स्वत:चा दावा केला होता. त्यानुसार ते निवडणूक आयोगात गेले. उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगात शिंदेंचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना अपयश आले. Shivsena Crisis आयोगाने सर्व कायदेशीर बाजू तपासून आणि घटनेच्या चौकटीत राहूनच शिंदेंना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही दिले आहे. त्यामुळे ठाकरे जे काही बोलत आहेत, त्याला केकाटणे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली, ती वाढवली, जनमानसात लोकप्रिय केली, ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने खड्ड्यात जाऊ नये याची तजवीजच जणू आयोगाने करून दिली, असे म्हटले पाहिजे. Shivsena Crisis कारण आज ज्या शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांच्या हाती शिवसेना सोपविण्यात आली आहे, ती सुरक्षित हाती आहे, असे म्हणता येईल. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच आम्ही पुढे चाललो आहोत, त्यांच्या विचारांनुसारच आम्ही हिंदुत्वाची पताका भारतभर फडकवणार आहोत, असे सांगतच शिंदे यांनी त्यांची नवी कारकीर्द सुरू केली होती, याकडे डोळेझाक करता यायची नाही.

बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार उद्धव ठाकरे यांनी शकुनीमामाच्या चिथावणीला बळी पडत शरद पवारांच्या दावणीला बांधला होता, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. Shivsena Crisis असे नसते तर पालघर येथे हिंदू साधूंची हत्या झालीच नसती आणि हत्या झाल्यानंतर आरोपी मोकाट फिरले नसते. एक आमदार आणि एक महिला खासदार हनुमान चालीसाचे पठन करू इच्छित होते, त्यांनाही अटकाव करण्याचा वेडेपणा उद्धव यांच्या हातून झाला नसता. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या हाताने आणि कृतीने पक्ष आणि चिन्ह गमावले आहे. जे बाळासाहेबांकडून वारशाने मिळाले होते, ते गमावण्याची वेळ केवळ आणि केवळ हिंदुत्वाशी फारकत घेतल्यामुळेच झाली, हे निश्चित! Shivsena Crisis भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता. भाजपाशी युती करूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांनी लढल्या होत्या. जनतेने युतीला प्रचंड बहुमत दिले होते. सरकार भाजपा आणि शिवसेना यांचेच येणे अपेक्षित असताना उद्धव ठाकरे यांनी वेगळा मार्ग पत्करला. सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी करायच्या सोडून उद्धव ठाकरे हे शेतक-यांच्या बांधावर जाऊन बसले, तिथे जाऊन मोठ्या रकमेची मदत त्यांनी शेतक-यांसाठी मागितली; इथपर्यंत ठीक होते. Shivsena Crisis पण, देवेंद्र फडणवीसांचे फोनच उचलायचे नाहीत, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रतिसाद द्यायचा नाही आणि संजय राऊतांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पडद्यामागे बोलणी करायची आणि सरतेशेवटी भाजपाला बाजूला ठेवत जनतेने नाकारलेल्यांसोबत सरकार स्थापन करायचे, हा ठाकरेंचा सगळा पराक्रम राज्यातल्या जनतेने पाहिला आहे. Shivsena Crisis त्यामुळे आज जे काही घडले आहे, त्याबाबत तुम्ही कितीही बेंबीच्या देठापासून बोंबललात तरी कुणीही त्यावर विश्वास ठेवायचे नाही.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी एकदा जनतेशी संवाद साधला आहे आणि काल, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मळमळ बाहेर काढली आहे. Shivsena Crisis निवडणूक आयोगाचा निकाल आपल्या बाजूने लागला असता तर ठाकरे म्हणाले असते सत्याचा विजय झाला. पण, विरोधात निकाल लागला म्हणून सत्य पराजित झाले आहे आणि निवडणूक आयोगही भ्रष्ट झाला आहे. आयोगात चाकर असणा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि म्हणून असा आयोगच बरखास्त करण्याची टोकाची मागणी त्यांनी केली आहे; जी हास्यास्पद, अनावश्यक, अनाठायी आणि घटनाबाह्य आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढले आहे. Shivsena Crisis २०२४ ची लोकसभा निवडणूक मोदींची शेवटची असेल, असे भाकीत त्यांनी केले आहे, जे खरे तर स्वत: ठाकरे यांच्या बाबतीत खरे ठरणार आहे. मोदी २४ साली जिंकल्यानंतर देशात नंगानाच सुरू होणार असल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत. Shivsena Crisis हा नंगानाच हाणून पाडायचा असेल तर आताच जागे व्हावे लागेल आणि सतर्क राहावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अशा बोलण्यातून त्यांच्या बालबुद्धीचेच दर्शन समाजाला घडते आहे. Shivsena Crisis एका अर्थाने जनतेचे छान मनोरंजनही होते आहे. मोदींच्या राजवटीत देश प्रगतीची एकेक कठीण शिखरे पार करीत आहे, संपूर्ण जगात देशाची प्रतिष्ठा वाढत आहे, भारतीय जनता पार्टीचे नावही जगभर पसरले आहे.

याउलट, ठाकरेंकडे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही आज राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे जे बोलत आहेत, ते पूर्णपणे नैराश्यातून बोलत आहेत, ते हताश झाले आहेत, हे इतरांनी समजून घ्यावे आणि त्यांना हसणे, त्यांच्यावर विनोद तयार करणे थांबविले पाहिजे. Shivsena Crisis त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जे होतं, ते चोरीला गेलं आहे. एखाद्याकडे चोरी झाल्यानंतर त्याची काय मन:स्थिती होते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ठाकरे आणि त्यांच्या सहका-यांची मन:स्थिती लक्षात घेऊन तरी त्यांना सहानुभूती दाखवायला नको? शिवसेना हा लढवय्यांचा पक्ष आहे. रडायचे नाही तर लढायचे, असा संदेश देणारा शिवसेना हा पक्ष हातून गेल्यापासून ठाकरे स्वत:च हा संदेश विसरले आहेत. Shivsena Crisis त्यामुळे बोलताना ते एकामागून एक चुका करताहेत. नैराश्य आल्यामुळे आपण काय बोलतो आहोत, त्याचे जनमानसावर, आपल्या समर्थकांवर काय परिणाम होणार आहेत, याचाही विसर त्यांना पडला आहे. Shivsena Crisis मोदींच्या पुन्हा निवडून येण्यामुळे देशात नंगानाच होणार आहे, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण मोदी २४ साली पुन्हा सत्तेत येतील. त्यानंतर महाराष्ट्रात होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला निर्विवाद यश मिळालेले असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हा या यशातील महत्त्वाचा भागीदार असेल.Shivsena Crisis हे उघड्या डोळ्यांनी पाहणे उद्धव यांना अवघडच जाईल. त्यामुळेच ते सतर्क होण्याच्या सूचना देत असावेत.

‘तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं आलं’ असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. Shivsena Crisis निवडणूक आयोगाच्या निकालामुळे तो जनतेने बदलविला आहे. ‘पक्ष गेला, चिन्हही गेलं आणि तोंडी केकाटणं आलं’ असा नवा वाक्प्रचार रूढ करण्याचा जनतेचा प्रयत्न असताना ठाकरे यांचे नैराश्य वाढतच चालले आहे. टीका करताना उद्धव ठाकरे यांना भान राहात नसल्याचा अनुभव येतो आहे. Shivsena Crisis माझे वडील चोरल्याचा आरोप ते करताहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा राग समजण्यासारखा असला, तरी आज शिंदे ज्या गतीने आणि धडाक्यात कामे करताहेत, ते लक्षात घेतले तर सहानुभूती शिंदेच्याच बाजूने जास्त राहील, हे उद्धव यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. Shivsena Crisis आपले उरलेसुरले समर्थक आपल्याच सोबत राहतील आणि भविष्यात आपण पुन्हा उभारी घेऊ, अशी जर ठाकरे यांची इच्छा असेल तर त्यांनी आता केकाटणे थांबवून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल, अशी वक्तव्ये केली पाहिजेत. Shivsena Crisis माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटल्याप्रमाणे शकुनीमामाच्या जाळ्यातून स्वत:ची सुटका करवून घेतली पाहिजे. अन्यथा, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर जे काही उरले आहे, तेही गमावण्याची वेळ येईल. Shivsena Crisis