---Advertisement---

दुर्दैवी ! चारचाकी वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यात हळहळ

---Advertisement---

जळगाव ।  छत्तीसगड येथे तैनात असलेल्या १४ बटालियन सीएएफ (आयआर) जवानाचा चारचाकी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. किशोर शिवाजी गायकवाड (४५, गाळण ‘विष्णुनगर’, ता. पाचोरा, जि. जळगाव ) असे मृत जवानाचे नाव आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात गाळण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पाचोरा तालुक्यातील गाळण (विष्णुनगर) येथील रहिवासी किशोर गायकवाड यांना लहानपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. कठीण परिश्रम करून किशोर गायकवाड हे सन २०११ मध्ये १४ बटालियन सीएएफ (आयआर) रायपूर येथे पोलिस दलात भरती झाले.

गेल्या १५ वर्षांपासून ते धानोरा, जि. बलोड (छत्तीसगड) येथील पोलिस दलात कर्तव्य बजावत होते. १ डिसेंबर रोजी सायंकाळी किशोर गायकवाड हे पत्नी सोबत बाजार करण्यासाठी व शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी रस्ता ओलांडताना एका चारचाकी वाहनाने किशोर गायकवाड यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

किशोर गायकवाड यांचा मृतदेह आज जळगाव येथे दाखल होणार असुन त्यांच्यावर शासकीय इतमामात गाळण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किशोर गायकवाड यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या किशोर गायकवाड यांच्या अकस्मात मृत्यूने गाळण (विष्णुनगर) सह परिसरात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment