---Advertisement---

Shahada Accident News : सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला, लोणखेडा गावावर शोककळा

---Advertisement---

शहादा : सुट्टीवर आलेल्या जवानाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा येथे १८ मार्च रोजी दुपारी घडली. नंदलाल यशवंत शिरसाट (वय ३१, रा. लोणखेडा ता. शहादा ) असे मृत जवानाचे नाव आहे.

भारतीय स्थलसेनेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले नंदलाल शिरसाट हे एक महिन्याची सुटी घेऊन गावाकडे आले होते.
मोरफळ येथे सालीचा हळदीचा कार्यक्रम असल्याने ते लोणखेडा येथून १८ मार्च रोजी दुपारी मोरफळ जाण्यासाठी दुचाकीने ( क्र. एम.एच.३९ ए.एफ.९५९२) निघाले.

दरम्यान, शिंदखेडा येथे हायवा गाडीत मागून धडकल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरसाट कुटुंबासह संपूर्ण लोणखेडा गावावर शोककळा पसरली आहे. नंदलाल शिरसाठ यांच्या पश्चात वडील यशवंत शिरसाठ, आई मीनाबाई, पत्नी माधुरी, मुलगा खुशाल व भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदलाल शिरसाट हे भारतीय स्थलसेनेत शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांची ड्युटी जम्मू येथे होती, सुट्टीनंतर ते जाणार होते. मात्र त्याआधीच असं घडल्याने शिरसाट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment