---Advertisement---

मुलाचे बारसे सोडून एरंडोलातील जवानाने गाठली युद्धभूमी!

---Advertisement---

जळगाव : भारत-पाक तणावामुळे रजेवर आलेल्या जवानांना तात्काळ कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे. अशात एरंडोल येथील जवान लक्ष्मण अशोक चौधरी (३३) हे मुलाचे बारसे होण्याआधीच घरच्यांचा आशीर्वाद घेत तातडीने कर्तव्यावर रवाना झाले. त्यानंतर लक्ष्मण यांनी बारशाचा कार्यक्रम व्हिडिओद्वारे पाहिला.

एरंडोल येथे बुधवार दरवाजा परिसरातील रहिवासी व माजी उपनगराध्यक्ष अशोक सुखदेव चौधरी यांचे पुत्र लक्ष्मण चौधरी हे चार वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले. सध्या ते धनबाद (बिहार) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहेत.

लक्ष्मण यांना मुलगा झाल्याचे त्यांच्या परिवाराकडून कळविण्यात आले. त्यामुळे २० दिवस रजा घेऊन येथे ५ मे २०२५ रोजी घरी पोहोचले होते. ९ मे २०२५ रोजी त्यांना धनबाद येथे ताबडतोब कर्तव्यावर रुजू होण्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानुसार बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमापेक्षा देशसेवेला पाधान्य देत ते ११ मे २००५ रोजी सकाळी जळगावहून रेल्वेने धनबादकडे रवाना झाले.

१२ मे २०२५ रोजी सायंकाळी त्यांच्या बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी लक्ष्मण यांच्या बहिणी व नातेवाईक हेसुद्धा घरी आले होते. १२ रोजी बारशाचा कार्यक्रम लक्ष्मण व्हिडिओद्वारे पाहिला.

भावाचे लग्न सोडून जवान परतला कर्तव्यावर

नंदुरबार : भावाच्या लग्नाच्या तयारीची लगबग सुरू, सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण, वायू दलात असलेला लहान भाऊ सुट्टी काढून आला. परंतु अचानक वायू दलातून फोन येतो आणि लागलीच जम्मूत ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश आले. जवान सर्व सोडून लागलीच देशसेवेसाठी माघारी फिरतो. घरातील सदस्यदेखील मोठे मन दाखवून त्याला निरोप देतात. खेतिया येथील पोस्ट ऑफिस गल्लीत राहणारा चिराग अजबसिंह सिसोदिया हा भारतीय वायू सेनेत लीडिंग एयरक्राफ्ट मेन वर कार्यरत आहे. त्याच्या मोठा भाऊ केशव सिसोदिया याचा विवाहसोहळा असल्याने चिराग हा १५ दिवसाची सुट्टी काढून ६ मे रोजी खेतिया आला होता. परंतु अचानक वायू दलातून फोन येतो आणि लागलीच जम्मूत ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश आले. त्यामुळे चिराग सिसोदिया यालाही तात्काळ भारतीय वायू सेनेकडून पाचारण करण्यात आले. वायूदलाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर चिराग हा तात्काळ जम्मू येथे रखाना झाला. घरात लग्नाचे सोपस्कर पार पडत असतांना तसेच लग्नाला अवघे दिवस बाकी असताना जवान सीमेवर रवाना झाला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment