---Advertisement---

ही काही स्वप्न बदलून टाकतील तुमचं भाग्य

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. ते भविष्यात घडणाऱ्या सुखद आणि दुःखद घटनांबद्दल आपल्याला काही संकेत देत असतात. मात्र स्वप्नातील संकेत ओळखता आले तर तुम्हाला पुढे घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेचा अंदाज लावता येऊ शकतो.

जर तुम्ही स्वप्नात भक्तिभावाने पूजा करताना दिसले तर याचा अर्थ देवाने तुमचे ऐकले आहे.  जर एखाद्या मुलीला स्वप्नात दिसले की ती आलिशान पॅलेसमध्ये मेजवानीचा उपभोग घ्यायला किंवा समारंभात जात आहे, तर तिचे लग्न एखाद्या श्रीमंत माणसाशी होईल.

जर स्वप्नात एखादे मूल हाक मारताना दिसले तर समजावे की तुमच्या प्रियकराने दुसऱ्या स्त्रीशीही संबंध प्रस्थापित केले आहेत. जर एखाद्याला स्वप्नात कोणी कांदा खाताना दिसले तर त्याला त्याच्या प्रेयसी/प्रियकराकडून खरे प्रेम मिळेल. जर अविवाहित व्यक्ती मित्राच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना दिसली तर समजावे की त्याला धनाचा लाभ होईल आणि त्याचे लग्नही निश्चित होईल. ,

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment