---Advertisement---
Mother-in-law and son-in-law story : उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या प्रकरणाबद्दल तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेलच. त्या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच आता अशीच एक घटना समोर आली आहे. ज्याच्यासोबत मुलीचं लग्न लावून दिलं, त्याच्यावरच सासूचा जीव जडला… नंतर जे घडलं, ते एखाद्या सिनेमासारखं आहे.
पोलीस सूत्रानुसार, एका ४० वर्षीय विधवा महिलेने तिच्या मुलीचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतर मुलगी पतीसह वारंवार तिच्या आईला भेटायला येत असे. दरम्यान, जावई आणि सासू यांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी एकत्र लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघांनीही घरी लग्नाची तयारी करून वधू-वराचा पोशाख घातला. जावयाने सासूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सुरुवात करताच त्याची बायको आत आली. हे पाहताच ती जोरात ओरडली आणि म्हणाली की ”तुम्ही दोघे काय करत आहात”? यामुळे तिघांमध्ये वाद झाला.
संतापून सासूने तिच्या जावयासह तिच्याच मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला, ज्यात ती गंभीर जखमी झाली. घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी धावले.
त्यांनी गंभीर जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. नंतर, सासू आणि जावयाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.