Jalgaon Crime : दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, मुलाने विळा मारून पित्याला संपविले


जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चांदसर (ता. धरणगाव) येथे घडली. छगन यादव कोळी (७५) असे मृत पित्याचे तर समाधान छगन कोळी (४२) असे संशयित मुलाचे नाव आहे.

याबाबत राजू सीताराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा समाधान कोळी याच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला अटक करण्यात आली आहे.

चांदसर येथे दि.५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छगन कोळी व त्यांचा मुलगा समाधान यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला. समाधान हा वडिलांकडे दारुसाठी पैसे मागायचा आणि यासाठी त्रासही देत होता.

५ ऑगस्ट रोजी त्याने वडिलांकडे दारुसाठी पैसे मागितले. पण वडिलांनी पैसे न दिल्याने समाधान याने घरात असलेल्या विळ्याने वडिलांच्या पोटावर वार केले. यात ते जखमी झाले. त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवार दि. ११ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा समाधान कोळी याच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---