---Advertisement---
Extramarital affair : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या मुलाला आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवलं, अश्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्या तुम्ही वाचल्या असतीलच… आता आणखी अशीच एक घटना समोर आहे, मात्र इथे महिलेच्या मुलाने भयंकर कांड केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, अजय (नाव बदलले आहे) याचे शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद होत होते. दरम्यान, दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे गावात प्रचंड गोंधळ उडाला. हे प्रकरण सोडवण्यासाठी पंचायत आयोजित करण्यात आली.
मात्र, हा प्रकार (अनैतिक संबंध) थांबत नसल्याने संतापलेल्या महिलेच्या मुलाने भयंकर कांड केलं. झालं असं की, महिलेच्या प्रियकराचे वडील सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोठ्यात लसूण पेरत होते. यावेळी महिलेचा मुलगा हा दोन जणांसह दुचाकीवरून आला आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
२७ वेळा चाकूने वार
यानंतर त्याने त्यांच्यावर २७ वेळा चाकूने वार केले. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्ल्यात त्या देखील जखमी झाल्या. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्लेखोरांत एक महिला असल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली असून, या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.