अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नुकतेच लग्न बंधनात अडकले. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सोनाक्षीने तिच्या आई आणि वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले असून तीने आईला मिस करत असल्याचे सांगितले आहे.
यासोबतच सोनाक्षीने हे देखील सांगितले की, तिची आई पूनम तिच्या जाण्यावर कशी रडू लागली, जेव्हा तिला समजले की तिची मुलगी लग्नानंतर घरातून निघून जाईल, तेव्हा सोनाक्षीने तिला सांगितले होते की, ती घरापासून 25 मिनिटे दूर राहते . फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “लग्नाच्या वेळी जेव्हा आईला कळले की मी घरातून निघून जात आहे, तेव्हा ती रडू लागली, मी तिला म्हणाली, “आई, काळजी करू नकोस, जुहूपासून बांद्रा फक्त 25 मिनिटांच्या अंतरावर आहे. आज मी तिला जरा जास्तच मिस करत आहे, म्हणून मी स्वतःला तेच सांगत आहे.”
आईची साडी
सोनाक्षीने तिच्या लग्नात आईची साडी नेसली होती. 9 जुलै 1980 रोजी पूनम सिन्हा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी पांढऱ्या हस्तिदंती साडीत लग्न केले. सोनाक्षीने तिच्या खास दिवसासाठी ही साडी निवडली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर झहीरने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. रिसेप्शनमध्ये सोनाक्षीने लाल साडी, केसात सिंदूर आणि केसात गजरा घालून तिचा लूक पूर्ण केला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सुरुवातीला सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला अफवा म्हटलं जात होतं, पण नंतर सोनाक्षीच्या मैत्रिणीने स्टेटमेंट देऊन याला दुजोरा दिला.