---Advertisement---
Sonam Raghuvanshi : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. सोनमचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तीन कॉन्ट्रॅक्ट किलर देखील पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी सोनमच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत.
राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सोनमला राजा रघुवंशी आवडत नव्हता. परंतु तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने राजासोबतचे तिचे लग्न लावून दिले. दरम्यान, सोनमने ”जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा अर्थ काय असतो, हे मी तुम्हाला दाखवते”, असा इशारा तिच्या कुटुंबीयांना दिला होता, अशी माहिती मेघालय पोलीस तपासात समोर आली आहे.
काय म्हणाली राजाची आई ?
राजा रघुवंशीच्या आईने सांगितले की, सोनमने तिच्या मुलाला प्यादा म्हणून वापरले. सोनमच्या दबावाखाली राजा शिलाँगला गेला होता. माझ्या मुलाला मारले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी सून, जिला मी माझी मुलगी मानत होते, ती असे काही करेल. लग्नापूर्वी माझा मुलगा राजा एकदा मला म्हणाला होता की सोनम माझ्याशी बोलत नाही. जर ती लग्नापूर्वी बोलत नसेल तर लग्नानंतर कशी बोलेल? यानंतर, जेव्हा मी सोनमशी बोलले तेव्हा ती राजाशी बोलू लागली. ती इतकी धूर्त असेल हे मला माहित नव्हते.
घटनेनंतर सोनम इंदूरला
राजा आणि सोनमचे ११ मे रोजी लग्न झाले. येथून सोनमने राजाला हनिमूनसाठी शिलाँगला घेऊन जाण्याचा आग्रह धरला. येथेच राजाची हत्या झाली. गुन्हा केल्यानंतर सोनम इंदूरला आली आणि भाड्याच्या घरात राहिली. त्यानंतर तेथून ती कारने यूपीला गेली. त्यानंतर वाराणसीमार्गे ती गाजीपूरला पोहोचली, जिथून पोलिसांनी तिला अटक केली.