---Advertisement---

‘शारीरिक संबंधाआधी देवीला नैवेद्य लागेल’, सोनमने खोटं बोलून नेलं अन् राजाला संपवलं !

---Advertisement---

Sonam Raghuvanshi : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. सोनमचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तीन कॉन्ट्रॅक्ट किलर देखील पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, सोनमने लग्नानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी देवीला नैवेद्य अर्पण करावा लागेल, असे सांगून पती राजा रघुवंशीला नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी आरोप केले आहे की, सोनमला राजा रघुवंशी आवडत नव्हता. परंतु तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने राजासोबतचे तिचे लग्न लावून दिले. दरम्यान, सोनमने ”जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा अर्थ काय असतो, हे मी तुम्हाला दाखवते”, असा इशारा तिच्या कुटुंबीयांना दिला होता.

तर तिला फाशी द्या – सोनमचा भाऊ

सोनमने लग्नानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी देवीला नैवेद्य अर्पण करावा लागेल, असे सांगून पती राजा रघुवंशीला नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच राजा रघुवंशी याचा हत्या करण्याचा कट सोनम आणि तिच्या प्रियकराने रचल्याचे देखील उघड झाले असून, आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांत सोनम दोषी दिसत आहे. जर हा गुन्हा सिद्ध झाला तर तिला फाशी द्या, अशी मागणी सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी केली आहे.

काय म्हणाली राजाची आई ?

राजा रघुवंशीच्या आईने सांगितले की, सोनमने तिच्या मुलाला प्यादा म्हणून वापरले. सोनमच्या दबावाखाली राजा शिलाँगला गेला होता. माझ्या मुलाला मारले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी सून, जिला मी माझी मुलगी मानत होते, ती असे काही करेल. लग्नापूर्वी माझा मुलगा राजा एकदा मला म्हणाला होता की सोनम माझ्याशी बोलत नाही. जर ती लग्नापूर्वी बोलत नसेल तर लग्नानंतर कशी बोलेल? यानंतर, जेव्हा मी सोनमशी बोलले तेव्हा ती राजाशी बोलू लागली. ती इतकी धूर्त असेल हे मला माहित नव्हते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment