ज्वारी चे धिरडे; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।१३ फेब्रुवारी २०२३। सकाळी प्रत्येकाने नाश्ता केला पाहिजे त्यामुळे दिवसभर एनर्जी रहाते. ज्वारी चे धिरडे सुद्धा तुम्ही नाष्ट्याला बनवू शकतात. ज्वारी चे धिरडे कसे  बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
ज्वारीचे पीठ,  तांदूळ पीठ,  हळद,  जीरे, मिरची, मीठ, तेल, उकळत पाणी आवश्यक्तेनुसार

कृती सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तेल वगळून सर्व साहित्य घ्यावे. चमच्याने सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे.आता ह्यामध्ये उकळते पाणी थोडे थोडे घालून रव्या डोस्याप्रमाणे पीठ सारखे करून घ्यावे. आता तवा गरम करून घ्यावा. त्यावर २-३ थेंब तेल सोडून हे पीठ चांगले ढवळून डोस्याप्र्माणे पसरून घ्यावे. दोन-तीन मिनटे झाकण ठेऊन एका बाजूने होऊ द्यावे.आता झाकण काढून, धिरडे परतून दुसया बाजूनेही शिजवून घ्यावे. गरमागरम सर्व्ह करावे.