World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सराव सामने खेळले जाणार आहेत, जे आजपासून (29 सप्टेंबर) सुरू होणार आहेत. पहिला सराव सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे होणार आहे. पहिल्या दिवशी एकूण तीन उबदार सामने होतील. दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात तिरुअनंतपुरममध्ये तर तिसरा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात हैदराबादमध्ये होणार आहे.
टीम इंडिया ३० सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. तर 5 ऑक्टोबर 2023 पासून विश्वचषकाला सुरवात होईल. दरम्यान, २०२३ विश्वचषक कोण जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने वर्ल्डकपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुलीने भारत वर्ल्ड कप जिंकेल पण त्यासाठी एक गोष्ट गरजेची असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले दादा?
यंदाचा वर्ल्ड कप हा मोठा असणार असून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आताच भारताने अशिया कप जिंकला असून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकाही भारताने जबाबदार कामगिरी करत ही मालिका जिंकली. भारत आता ज्या प्रकार खेळत आहे तशीच कामगिरी पुढील 45 दिवस केली तर भारत यंदाचा वर्ल्ड कप नक्की जिंकेल, असं सौरव गांगुली याने म्हटलं आहे.