साऊथ इंडियन स्टाइल पोहे रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ८ एप्रिल २०२३। साऊथ इंडियन पोहे ही डिश कर्नाटकची लोकप्रसिद्ध रेसिपी असून वाटलेले तांदूळ किंवा पोह्यांपासून ही तयार केली जाते. विविध चविष्ट व्यंजनांचा वापर करून बनवली जाणारी अतिशय स्वादिष्ट अशी डिश आहे. तिखट, आंबट आणि गोड अशा विविध स्वादांनी परिपूर्ण असणारी अशी ही डिश तुमच्या पसंतीस नक्कीच उतरेल. सकाळच्या व संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक हेल्दी पर्याय असून यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. हि रेसिपी घरी कशी बनवावी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
१ कप ब्राउन राइस पोहा, १कप किसलेले नारळ, १.४ कप गुळाची पावडर, ४  चमचे चिंचेचा रस, १ कप पाणी, ३ चमचे शेंगदाण्याचे तेल, १ चमचे मोहरीच्या बिया, १ चमचे कच्चे शेंगदाणे, १ चमचे भाजलेले जिरे,  भाजलेले मेथीचे दाणे, १ चमचे काळे तिळ, आवश्यकतेनुसार कढीपत्ता, आवश्यकतेनुसार हिंग, आवश्यकतेनुसार लाल तिखट, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार हळद, १चमचे उडदाची डाळ, १ चमचे चणा डाळ

कृती 
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये पोह्यांची पावडर घेऊन त्यात चिंचेचा रस, मीठ घाला आणि सर्व सामग्री चांगली मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट असल्यास त्यात थोडं पाणी घालून पुन्हा सामग्री एकजीव करा. एका वेगळ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, चण्याची डाळ, उडदाची डाळ व शेंगदाणे घालून सर्व सामग्री २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आता या मिश्रणात लाल बेडगी मिरच्या, हिंग, कढीपत्ता, किसलेले खोबरे, जिरे किंवा जिरेपुड, मेथीदाणे, भाजलेल्या तिळांची पावडर किंवा तीळ, हळद, मीठ, रस्सम पावडर व गुळ पावडर घालून पुन्हा ३ ते ४ मिनिटे मिश्रण शिजवा. परतलेल्या मसाल्यात पोह्यांचे मिश्रण घालून २ मिनिटे शिजवा. तयार आहेत साऊथ इंडियन स्पेशल हेल्दी व टेस्टी पोहे! गरमा गरम पोह्यांवर आपण आवडीचं नमकिन घालून आस्वाद घेऊ शकतो.