---Advertisement---

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी कॅन्सरशी झुंजतोय? अभिनेत्याने स्वतः ट्विट करून सांगितलं सत्य

---Advertisement---

नवी दिल्ली : साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्यांच्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. अशा परिस्थितीत, नुकतीच एक बातमी समोर आली आहे. अभिनेते चिरंजीवी यांना कॅन्सर झाल्याचं धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे. आता याबाबत अभिनेत्याने स्वतः ट्विट करून याचा खुलासा केला

काय म्हणाले चिरंजीवी?

चिरंजीवींनी ट्विटरवर एक ट्विट शेअर केलं आहे. यामधून त्यांनी सांगितलं आहे की, ‘त्यांना कॅन्सर झालेला नाहीय. किंवा ते कॅन्सर या आजाराच्या विळख्यात आलेले नाहीयेत.

त्यांनी पुढे सांगितलं की,  ‘काही दिवसापूर्वी मी एका कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना कॅन्सरबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचं बोललो होतो. मी तुम्हाला सांगितले की तुम्ही नियमित वैद्यकीय तपासणी करून घेतल्यास कर्करोग टाळता येऊ शकतो. मी सावध होतो आणि म्हणून कोलन स्कोप चाचणी केली. मी म्हणालो की कर्करोग नसलेले पॉलीप्स सापडले आणि काढून टाकले. जर माझी चाचणी वेळेत झाली नसती तर नंतर त्याचे कर्करोगात रुपांतर झाले असते. म्हणूनच प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि वैद्यकीय चाचणी/स्क्रीनिंग करून घ्या. एवढंच बोललो.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment