तरुण भारत लाईव्ह ।२० फेब्रुवारी २०२३। बिर्याणीच नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. तिखट आणि झणझणीत अशी बिर्याणी घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पी आहे. सोयाबीन बिर्याणी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
बासमती तांदूळ, सोयाबीन, जिरे, हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मटार, कॉर्न, फ्रेंच बीन्स, फ्लॉवर, गाजर, दुधी, पुदिन्याची पाने, चिरलेला कांदा हिरवी पेस्ट, लसूण पाकळ्या.
कृती
सर्वप्रथम कांदा बिर्याणीसारखा सोनेरी रंगावर तळून बाजूला ठेवा. एक मोठ्या पातेल्यात प्रमाणात तांदळाच्या दुप्पट पाणी घ्या. पाण्याला उकळी आल्यावर त्यात प्रमाणात दिलेला खडा मसाला घाला आणि तांदूळ घाला. सोबत एका पातेल्यात सोयाबीन भिजायला घाला. भिजलेले सोयाबीन पाण्यासोबत गॅसवर ठेवा आणि 10 मिनिटे शिजवून घ्या. दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात 5 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. त्यात शहाजिरे, 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे ठेचलेले आले लसूण, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद पावडर घाला आणि चांगले परतवून घ्या.
भाज्या झाकून शिजवून घ्या. त्याचबरोबर भिजवलेले सोयाबीन घाला. भाजी सोबत परतवून घ्या. त्यात दही आणि थोडीशी साखर घाला मीठ भाजी पुरते घाला. भाजीत थोडेसे पाणी घाला. त्यावर अर्धवट शिजवलेला भात घाला त्यावर कोथिंबीर, तळलेला कांदा घाला. त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घ्या. बिर्याणीच्या बाजूने तूप घालून घ्या.