मालमत्ता करात विशेष सूट; महिलांसाठी अतिरिक्त ५ टक्के सवलत ‘ही’ आहे अंतिम तारीख

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : मनपाकडून २०२३-२०२४ च्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १४० अ मधील तरतूदी नुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना मालमत्ता कर (खुला भुखंड करासह) व पाणी पट्टी कराचा भरणा १७ एप्रिल पासून मालमत्ता करात १० टक्के सूट देण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिला मिळकतधारक असल्यास त्यांना ५ टक्के अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनपाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. यंदा महिला मिळकतधारक असल्यास त्यांना १५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सवलत केवळ एप्रिल महिन्यापर्यंत मर्यादित न ठेवता महापालिकेने मुदत ३१ जूनपर्यंत दिली आहे.

महिला मालमत्ताधारकांना अतिरिक्त ५ टक्के सवलत

चालू आर्थिक वर्षा करीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १४० अ मधील तरतूदींनुसार महीलांच्या नांवे असलेल्या फक्त एका राहत्या निवासी मिळकतीस मालमत्ता करात (राज्य शासनाचे कर वगळून) अतिरिक्त ५% ( रिबेट) सुट खालील अटी व शर्ती नुसार महापौर यांनी महासभेच्या कार्योत्तर मान्यतेच्या अधिन राहून अंमलबजावणी करणेस मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार महापालीकेची हि सुट (रिबेट) देण्यात येणार आहे.

अटी व शर्ती

१) महीलांच्या नावे असलेल्या मिळकती की ज्या सदर महीलेच्या राहत्या व निवासी आहेत.
२) भाडयाने दिलेल्या मिळकतीस तसेच अनिवासी वापराच्या मिळकतीस सदर सुट लागु राहणार नाही.
३) सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारची थकबाकी असता कामा नये.
४) शहरातील कोणत्याही फक्त एकाच मिळकतीवर सदर सुट देय राहील.
५) सदर मिळकतीचे मालकी हक्काचे कायदेशीर कागदपत्रे महानगरपालिकेकडे सादर केले नंतर सदर सुट देय राहील.
६) सदर मिळकत ही केवळ महिलेच्या नावे असावी ती सयुक्त रित्या पुरूष व महिला यांचे नांवे नसावी.
७) सदरची सुट महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १४० अ नुसार दिल्या जाणाऱ्या १० टक्के सुट (रिबेट) ज्या कालावधीत देय असेल त्याच कालावधीमध्ये देण्यात येईल. वरील अटी शर्तीची पूर्तता करीत असल्याबाबतचा अर्ज, स्वयंघोषणापत्र व कागदपत्रे दिल्यानंतरच सदरची सुट (रिबेट) देण्यात येईल.

भरणा ऑनलाईन करता येणार

शहरातील मिळकतधारकांना कराचा भरणा करता यावा याकरीता जळगाव महानगरपालिका प्रशासनाने http://jalgaonmc.org या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन भरणा करता येईल, सदर भरणा करतांना तो NEFT BANKING/ DEBIT CARD / CREDIT CARD / UPI AAP/ PHONEPAY / GOOGLE PAY द्वारे करता येईल. तसेच कराचा भरणा कार्यालयात येऊन रोखीने, धनादेशाद्वारे किंवा डी. डी. द्वारेसुध्दा करता येईल. तरी जास्तीत जास्त मिळकतधारकांनी कराचा भरणा करुन सुट (रिबेट) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.