तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रुवारी २०२३। विदेश मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने दर चार वर्षांनी विश्व हिंदी सम्मेलनाचे आयोजन केले जाते. या वर्षीचे १२ वे विश्व हिंदी सम्मेलन फीजी या देशात दि.१५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे.
या वर्षीचे सम्मेलन हे “हिंदी पारंपारिक ज्ञान से कृत्रिम मेधा तक ” या विषयावर केंद्रीत असून या विषयाशी संबंधित १० उप विषयावर वेगवेगळे सत्र होणार आहे. त्यामध्ये ” हिंदी सिनेमा के विविध रूप : वैश्विक परिदृश्य ” या विषयावर विशेष निमंत्रित वक्ता म्हणून प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी हे आपले विचार मांडणार आहेत . त्यासाठी विदेश मंत्रालया कडून त्यांना निमंत्रण प्राप्त झाले असून भारत सरकारच्या प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी या अगोदर कोलंबो, श्रीलंका , मास्को, रशिया व मॉरेशियस इ.देशांमध्ये आयोजित सम्मेलन/चर्चा सत्रात आपले शोध निबंध सादर केलेले आहेत.
प्रा.डॉ..सुनील कुलकर्णी हे मूळचे जालना येथील देशगव्हाणचे रहिवासी असून मागील १७ वर्षांपासून विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये कार्यरत आहे. सध्या त्यांच्याकडे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील आहे.