माजी नगरसेवकाच्या गोदामात आयजींच्या पथकाने टाकला छापा, 89 लाखाची दारू जप्त

नवापूर : येथील माजी नगरसेवकाच्या गोदामात नाशिक आयजींच्या विशेष पथकासह स्थानिक पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये तब्बल 89 लाख दोन हजार 495 रुपयांची देशी-विदेशी दारू, दोन लाख 78 हजार 309 रुपयांची रोकड व चारचाकी-दुचाकी वाहने जप्त केली.   या प्रकरणी 15 संशयीतांना अटक करण्यात आली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नवापूर पोलीस ठाणे हद्दीत गणेश हिल परीसरात माजी नगरसेवक विश्वास भीमराव गढरी हा त्याच्या हस्तकांमार्फत त्याचे गोदामात अवैधरीत्या विदेशी दारू व बिअरचा साठा करून गुजरात राज्यात दारू विक्रीवर बंदी असताना देखील वाढीव दराने विकत असल्याची माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांना मिळाली होती. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, बशीर तडवी, हवालदार शकील शेख, पोलिस नाईक प्रमोद मंडलीक, मनोज दुसाणे, नारायण लोहरे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी, पोलीस परमानंद काळे, रणजीत महाले यांनी छापा टाकला. यामध्ये तब्बल 89 लाख दोन हजार 495 रुपयांची देशी-विदेशी दारू, दोन लाख 78 हजार 309 रुपयांची रोकड व चारचाकी-दुचाकी वाहने जप्त केली.

या प्रकरणी कौशिक सुरेशभाई पटेल (36, उदवाडा, कलसर, ता.पारडी, वलसाड, गुजरात), पंकजभाई ईश्वरभाई पटेल (31, सरसीया बस्ता फलिया, खेरगाम, जि.नवसारी, गुजरात), शाम अचल माजी (28, रीया, थाना चेवथर, जि.रीवा, मध्यप्रदेश), अंगतसिंह दिनेशसिंह भदौरीया (24, बिजपुरी पोलावन, भिड, मध्यप्रदेश), प्रतीक सुमनभाई पटेल (23, सरोडी, ता.बलसाड, गुजरात), अखिलेश शिवदान सिंह भदोरीया (21, बिजपुरी पोलावन, भिंड, मध्यप्रदेश), अनिलसिंह सुरेंद्रसिंह भदौरीया (29, बिजपुरी, पो.लावन, भिंड, मध्यप्रदेश), सामंतसिंह शिवपालसिंह भदौरीया (20, बिजपुरी पोलावन, भिंड, मध्यप्रदेश), सुरजकुमार हाकिम सिंह (20, जारखी, गाव गढी निर्भय, कुंडला, फिरोजाबाद, उत्तरप्रदेश), जितेंद्रसिंह समशेरसिंह भदौरीया (21, बिजपुरी, लायन, भिंड, मध्यप्रदेश), प्रदीपसिंह सिंग भदोरिया (27, बिजपुरी पो.लावन, भिड, मध्यप्रदेश), कृष्णकुमारसिंह शिवदानसिंह भदौरीया (22, बिजपुरी पोलावन, जि.भिंड राज्य मध्यप्रदेश), शार्मासिंह रामप्रसाद सिंह भदौरीया (40, ग्राम बिजपुरी, लावन, जि.भिंड, मध्यप्रदेश), शिवप्रताप तिलकसिंह भदोरीया (52, बिजपुरी पो. लावन, जि.भिंड, मध्यप्रदेश), अजित पवार लोखंडे (34, निपाणे, ता.पाचोरा), तौसीफ उर्फ आकाश रा.नवापूर, जि.नंदुरबार) व दोन अल्पवयीन मिळून 19 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील 15 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.