---Advertisement---
भुसावळ : दीपावली आणि छठ पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने बांद्रा टर्मिनस-बरौनी आणि उधना-भागलपूर या मार्गावर अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
क्रमांक ०९०७९ ही गाडी १५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान दररोज बांद्रा टर्मिनसहून रात्री ८:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता बरौनी येथे पोहोचेल. तसेच क्र. ०९०८० ही गाडी १७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दररोज बरौनीहून दुपारी ३:०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता बांद्रा टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वापी, भेस्तान, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज, पाटलीपुत्र, सोनपूर या ठिकाणी थांबे असतील.
उधना-भागलपूर अनारक्षित उत्सव विशेष गाडी
क्र. ०९०८१ ही गाडी १४ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान रोज उधना येथून सकाळी ११:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता भागलपूर येथे पोहोचेल. तसेच क्र. ०९०८२ ही गाडी १५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान रोज भागलपूरहून रात्री १०:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उधना येथे पोहोचेल.
या गाडीला चलथान, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, माणिकपूर, पाटणा, जमालपूर, सुलतानगंज या ठिकाणी थांबे असतील.