---Advertisement---
भुसावळ : नाताळ, नववर्ष तसेच हिवाळी सुट्टयांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून अमरावती-पुणे, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या मार्गावर एकूण १८ विशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.
अमरावती-पुणे-अमरावती साप्ताहिक विशेष (एकूण ६ सेवा)
गाडी क्रमांक ०१४०४ (अमरावती-पुणे) – २१ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत दर रविवारी, अमरावती येथून दुपारी १२.०० वाजता सुटेल; पुढील दिवशी रात्री १२.१५ वाजता पुणे येथे आगमन होईल. (३ सेवा)
गाडी क्रमांक ०१४०३ (पुणे-अमरावती)
दि. २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दर शनिवारी, पुणे येथून सायंकाळी ७.५५ वाजता सुटेल. पुढील दिवशी सकाळी ०९.२५ वाजता अमरावती येथे आगमन. (३ सेवा) थांबे Σ दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी -नागपूर-छत्रपती महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (एकूण ६ सेवा)
गाडी क्रमांक ०१००५ (सीएसएमटी-नागपूर)-२० डिसेंबर ते ०३ जानेवारी दर शनिवारी, सीएसएमटीहून रात्री १२.३० वाजता सुटेल; त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता नागपूर येथे आगमन. (३ सेवा) गाडी क्रमांक ०१००६ (नागपूर- सीएसएमटी) त्याच कालावधीत दर शनिवारी नागपूर येथून सायंकाळी ६.१० वाजता सुटेल; पुढील दिवशी सकाळी ०८.२५ ला सीएसएमटी येथे आगमन. (३ सेवा)
थांबे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा.









