तरुण भारत लाईव्ह ।०३ फेब्रुवारी २०२३। कामानिमित्त लॅपटॉप वर तासनतास काम करावे लागते आणि मोबाईल चा अतिवापर झाल्याने डोळ्यांवर ताण येतो. स्पष्ट दिसावे यासाठी काही लोक चष्मा वापरतात. चष्मा सतत वापरल्याने चेहऱ्यावर चष्म्याचे डाग पडतात. आणि कोणतेपण क्रीम्स वापरून डाग जात नाहीत. मग अशावेळी काही घरगुती पदार्थांचा वापर केल्याने चष्म्याचे डाग नाहीसे होतात. या घरगुती पदार्थांचा वापर कसा करावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
चेहऱ्यावरील चष्म्याचे डाग घालवण्यासाठी तुम्ही लिंबूच्या रसाचा वापर करू शकता. पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून कापसाने चेहऱ्यावर लावा. नंतर ५ मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा वापरावे.
काकडी ही देखील चेहऱ्यावरील डाग मिटवण्यास मदत करते. त्यासाठी काकडी गोल कापून, काकडीचे काप चेहऱ्यावर तसेच डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी त्यावर बदामाचे तेल लावून मसाज करा. त्यामुळे केवळ डाग दूर होत नाहीत तर चेहराही चमकू लागतो.