---Advertisement---

बापरे ! गरोदर महिलेला नेणारी रुग्णवाहिका घरात घुसली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

नंदुरबार : गरोदर महिलेला उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन थेट घरात घुसली. ही घटना नवापूरच्या भादवड येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेद्वारे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नवापूर तालुक्यातील भादवड येथे विसरवाडी येथून नंदुरबारकडे भरधाव वेगात जाणारी रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन घरात घुसल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. विसरवाडी येथून निघालेल्या या १०८ रुग्णवाहिकेतून गरोदर मातेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात येत असताना ही घटना घडली.

विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातून एमएच १४ सीटू १०६३ ही १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका गरोदर मातेला अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणत होती. सकाळी निघालेली ही रुग्णवाहिका ११:३० वाजेच्या सुमारास भादवड गावाजवळ आली असताना, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली रुग्णवाहिका थेट रस्त्यालगत असलेल्या एका घरात शिरली, यात घराचे नुकसान झाले, तर दुसरीकडे रुग्णवाहिकेचे नुकसान झाले.

अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गर्भवती मातेला खांडबारा ग्रामीण रुग्णालयातून बोलावण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतून मातेला जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---