दिल्ली विमानतळावर ‘स्पाइसजेट’ कंपनीच्या विमानाने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. विमानाच्या देखभालीचं काम सुरू असताना विमानाच्या इंजिनने पेट घेतला. या घटनेनंतर विमानतळावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने आग विझवली. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण केलं. विमानाला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
No. 1 engine of a Q400 belonging to SpiceJet caught fire on Bay 158 at DEL T1.
Further details awaited. pic.twitter.com/zurXrQre7k
— Vikram G Krishnan (@AvionViks) July 25, 2023
मंगळवारी दिल्ली विमानतळावर स्पाइसजेट कंपनीच्या एका विमानाच्या देखभालीचं काम सुरू होतं. हे काम सुरू असताना विमानाच्या इंजिनने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानाच्या देखभालीचं काम करणारे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.
‘स्पाइस जेट’ कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, संबंधित विमान जमिनीवर धावत असताना एका इंजिनने आगीचा इशारा (अलर्ट) दिला. यानंतर विमानाच्या देखभालीचं काम सुरू असताना विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागली. यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली. खबरदारी म्हणून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं. दिल्ली विमानतळावर विमानाला आग लागल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.