चटपटीत दही पापडी चाट

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। दही पापडी चाट ही रेसिपी उत्तर भारतातील प्रसिद्ध डिश असून ती लहान लहान पापड्या आणि दह्याचा वापर करुन बनवली जाते. दही पापडी चाट घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
पापडी, आवश्यकतेनुसार योगर्ट, आवश्यकतेनुसार धणे चटणी, आवश्यकतेनुसार चिंचेची चटणी, 1 कप कांदा, उकडलेले बटाटे, चाट मसाला, जिरे पावडर,  कोथिंबीरीची पाने, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार लाल मिरची, साखर, काळे चणे,  शेव

कृती 
सर्वप्रथम, एका वाटीत दही घेऊन दह्यात साखर घाला. त्यानंतर एका प्लेटमध्ये शेव पुरीसाठी वापरली जाणारी पापडी घेऊन त्यावर उकडलेल्या बटाट्यांचे काप ठेवा. आता त्यावर उकडलेले चणे, कांदा आणि दही टाका. मिश्रणात मीठ, जीरा पावडर आणि लाल तिखट टाका. आता त्यात कोथींबीर आणि चिंचेची चटणी मिक्स करुन चाट मसाल्याने गार्निश करा. सर्व्ह करण्याआधी कापलेली कोथींबीर आणि बारीक शेव त्यावर भुरभूरा. तयार झालं आपलं चटपटीत आणि टेस्टी दही पापडी चाट