झणझणीत पुणेरी मिसळ; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह । २१ फेब्रुवारी २०२३। मिसळ म्हटली की आपल्या तोंडाला पाणी सुटते, बाहेर आपण बऱ्याचवेळा मिसळपाव खातो. पण तुम्हाला माहित आहे का? मिसळ पाव हा पदार्थ घरी करायला सुद्धा खूप सोप्पा आहे. झणझणीत अशी मिसळ घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, लसूण पेस्ट, तिखट, धनेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर, जिरे आणि मोहरी, हळद, तेल  मीठ आणि पाणी, पाव

कृती
सर्वप्रथम मूग, मटकी, वाटाणा पाण्यात स्वच्छ धुवा आणि रात्री पाण्यात भिजत घालून मोड येण्यासाठी एका स्वच्छ कपड्यात बांधून ठेवा.सकाळी मोड आलेली मटकी, मूग, वाटाणा कुकरमध्ये हळद घालून तीन शिट्टी देऊन शिजवा नंतर एका पातेल्यात तेल गरम करून घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करून कांदा परतून घ्या त्यानंतर त्यात आलं – लसूण  पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद, धने पूड, आमचूर पावडर घालून मिक्स करा आणि परतवात्यामध्ये वाफवलेली मटकी, वाटाणा आणि मूग घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवा त्यामध्ये वरून पाणी घाला आणि उकळी काढा. उकळताना त्यात थोडासा बाजारात मिळणारा मिसळ मसाला तुम्ही घाला आणि शिजू द्या मिसळ तयार झाल्यावर एका बाऊलमध्ये काढा, त्यात वर कांदा, फरसाण, चिरलेली कोथिंबीर पेरा. बाजूला एका डिशमध्ये वेगळा कापलेला कांदा, लिंबू आणि पाव ठेवा आणि मस्तपैकी गरमा गरम मिसळ सर्व्ह करा.