तरुण भारत लाईव्ह ।०५ मार्च २०२३। राजमा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. त्यात सर्वाधिक फायबर आणि प्रथिने असतात. लोह, तांबे, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे पौष्टिक पदार्थ आढळतात. राजमा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. राजमा मसाला हा घरी करायला सुद्धा खूप सोप्पा आहे. राजमा मसाला घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
कांदे टमाटो ची पेस्ट, कोथिंबीर, राजमा, हळद, हिंग, मीठ, तेल, चणा मसाला पावडर, जिरे, लसूण, पाणी,आले लसणाची पेस्ट.
कृती
सर्वप्रथम राजमा ७ तास पाण्यात भिजत घाला. ७ तासानंतर राजमामध्ये थोडं पाणी घालून तो शिजवून घ्या. पाण्याला उकळी फुटू लागताच त्यामध्ये हळद आणि मीठ टाका. आता राजमाला ६ ते ७ शिट्ट्या द्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये चिमुटभर हिंग, आलं-लसणाची पेस्ट, कांद्याची पेस्ट घाला सामग्री परतल्यानंतर त्यात टॉमेटोची पेस्ट घाला आणि मिश्रण चांगलं शिजेपर्यंत ढवळत राहा. आता कांदा-टॉमेटोच्या मिश्रणात हळद, लाल तिखट पावडर आणि धण्याची पावडर घाला. सर्व सामग्री चांगली मिक्स करुन ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. मसाला घट्ट दिसू लागताच त्यामध्ये मीठ आणि राजमा मसाला घालून १ मिनिटे मिश्रण पुन्हा शिजवून घ्यावे.
त्यानंतर एका पॅनमध्ये तूप घालून तूप गरम करा त्यामध्ये चिमुटभर हिंग, जीरे, चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, लवंग आणि चिरलेला कांदा घालून सर्व सामग्री मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे चांगली परतून घ्या. कांद्याचा रंग लालसर दिसू लागताच गॅस बंद करा आणि उरलेला राजमा मसाला त्यामध्ये टाकून सामग्री चांगली मिक्स करा. राजमा व्यवस्थित शिजला असल्याची खात्री करुन त्यामध्ये परतलेला मसाला मिक्स करा. आता कुकरमधील राजमा व्यवस्थित शिजला असल्याची खात्री करुन घ्या आणि त्यामध्ये परतलेला मसाला मिक्स करा. मसाला घट्ट दिसू लागताच ५ मिनिटे उकळून घ्या. ५ मिनिटांनी मिश्रण घट्ट दिसू लागल्यास त्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा शिजवून घ्या. राजमा मसाला चांगला शिजल्यानंतर तो एका बाऊलमध्ये सर्व्ह करा. आता छोट्या कढईमध्ये बनवलेला तूपाचा तडका राजमा मसाल्याला द्या. या चटपटीत आणि खमंग राजमा मसाल्याचा गरमा गरम भात किंवा कुलच्यासोबत आस्वाद घ्या.