चटकदार टॅमोटोचे लोणचे

तरुण भारत लाईव्ह । १४ मार्च २०२३। उन्हाळा सुरु झाला असून आपल्याला काहीतरी आंबट गोड खावेसे वाटते. तर असाच आंबट गोड पदार्थ आपण आज पहाणार आहोत. टॅमोटोचे लोणचे. टोमॅटोचे लोणचे घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
चार-पाच मध्यम टोमॅटो अर्धा इंच आले तुकडा अर्धा छोटा चमचा मेथी दाणे चार चहाचे चमचे विनेगर पाच लसूण पाकळ्या दोन चमचे तिखट एक चहाचे चमचे हळद चिमटीभर हिंग अर्धा चहाचा चमचा मोहरी थोडे तेल चवीनुसार साखर व मीठ.

कृती
सर्वप्रथम, आले लसूण व दोन छोटे चमचे विनेगर टाकून वाटून ठेवा थोड्या तेलात हिंग व मेथी दाणे परतून त्याची वाटून पूड करा हिंग व मोहरी टाकून तेलाची फोडणी करा त्यातला सून व आले वाटण टाकून चांगले परता त्यावर टोमॅटो चिरून टाका तिखट हळद मीठ टाकून हे मिश्रण शिजवा त्यात मेथी पूड साखर व उरलेला विनेगर घाला सर्व एकत्र चांगले शिजवून घ्या थंड झाल्यावर कोरड्या बरणीत भरून ठेवा