तरुण भारत लाईव्ह ।०१ मार्च २०२३। मधल्या वेळेला आपल्याला भूक लागते त्यावेळी काय खावं असा प्रश्न पडतो. तर तुम्ही यावेळेला पालक ब्रेड कबाब खाऊ शकता. पालक ब्रेड कबाब हा घरी बनवायला खूप सोप्पा आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
पालक, मुगडाळ,ब्रेड, कांदा, मिरची, जिरे पावडर, मीठ.
कृती
सर्वप्रथम, भांड्यामध्ये पाणी घालून ब्रेड शिजवा आणि कढईत पाणी न घालता पालक शिजवायला ठेवा. नंतर एका भांड्यांमध्ये मुगाची डाळ, कांदा, मिरची, शिजलेला पालक, भिजवलेला ब्रेड, जिरेपूड आणि मीठ हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. तयार मिश्रणाचे गोळे करून तेलामध्ये हे गोळे तळून घ्या आणि गरमागरम पालक ब्रेड कबाब सर्व्ह करा.