Viral News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये थुंकीच्या मालिशचे एक प्रकरण समोर आले आहे. वेब सिटी पोलिस स्टेशन हद्दीतील दासना येथील एका सलूनमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच सलूनमधील दुसऱ्या ग्राहकाने बनवल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी सलून ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.
एसीपी वेब सिटी प्रियश्री पाल यांनी सांगितले, व्हायरल व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी सलून ऑपरेटरला अटक केली. पाल यांनी सांगितले, हा व्हिडिओ ग्राहकाने किंवा सलून मालकाच्या सहकाऱ्याने रेकॉर्ड केला आहे.
काय आहेत व्हिडिओत ?
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दाढी करण्यासाठी खुर्चीवर बसलेला स्पष्ट दिसत आहे. दाढी केल्यानंतर, सलून ऑपरेटर त्याला चेहऱ्याचा मसाज देतो. यासाठी तो प्रथम क्रीम हातात घेतो आणि नंतर त्या क्रीमवर दोनदा थुंकल्यानंतर, तो ग्राहकाच्या चेहऱ्यावर मालिश करू लागतो.
पोलिसांच्या मते, आरोपीचे हे कृत्य केवळ घृणास्पद नाही तर संसर्गजन्य रोग देखील पसरवते. आरोपीच्या या कृत्यामुळे ग्राहकाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलून ऑपरेटरचे नाव अर्शद अली असे आहे, जो दासना येथील असलम कॉलनीचा रहिवासी आहे. त्याने यापूर्वीही अशी कृत्ये केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.