---Advertisement---
भुसावळ : देशात नशामुक्ती (ड्रग-फ्री इंडिया) आणणे आणि तरुणांना फिटनेस व जागरूकतेचा संदेश देण्यासाठी नमो युवा रन 2025 हा भाजयुमोचा एक राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भुसावळ येथे राबविण्यात आला. हा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या संकल्पनेतून हा देशभर घेण्यात येत आहे.
नमो युवा रन २०२५ मॅरेथॉन स्पर्धेचे भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थित आयोजन करण्यात आली. यावेळी शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, खेळाडू, रनिंग क्लबचे सदस्य, शासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचारी, रेल्वे विविध विभागातील कर्मचारी, स्थानिक सामजिक क्षेत्रातील कार्यकर्ते विशेषतः युवक-युवती यांनी सहभाग घेतला होता.
मॅरेथॉन स्पर्धा देशभरात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येऊन लाखो तरुण सहभागी झाले आहेत. ज्यामुळे ही देशाच्या इतिहासातील सर्वाधिक सहभाग असलेली मॅरेथॉन स्पर्धा ठरली आहे.
ही स्पर्धा आयोजनासाठी भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपा महिला मोर्चा, रेल्वे असोसिएशन, स्थानिक स्पोर्ट असोसिएशन, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच स्पर्धेचे ठिकाण असलेल्या भुसावळ रेल्वे मैदान येथे स्पर्धा समाप्ती नंतर सेवा पंधरवडा अंतर्गत सहभागी सर्वांनी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.