SRH vs LSG IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद – लखनौ सुपर जायंटस् हे दोन तुल्यबळ संघ आज बुधवारी विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. लखनौ सुपर जायंटस्चे कर्णधार के एल राहील ने टॉस जिंकला असून, बल्लेबाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळपट्टीची काय स्थिती असेल ?
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीची आहे. येथे गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. तथापि, वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाज कमी प्रभावी ठरतात. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. मागील सामन्यात, SRH ने 201/3 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सने हा सामना 1 धावाने गमावला.
हवामान कसे असेल ?
Accuweather नुसार, 8 मे रोजी हैदराबादमध्ये गरम असेल. कमाल तापमान 37 अंशांपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 26 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. सामन्यादरम्यान पावसाचीही 49 टक्के शक्यता आहे.