SRH VS RR : थोड्याच वेळात हैदराबाद भिडणार राजस्थानशी; कोण मारणार बाजी ?

SRH VS RR : IPL 2024 चा 50 वा सामना गुरुवार, 2 मे रोजी राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहेत. राजस्थान 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ आजचा सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी सनरायझर्स संघाला गेल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे हैदराबादची भविष्यातील वाटचाल या सामन्यावर अवलंबून असेल. या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याविरुद्धचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे संघ अव्वल स्थानाबाहेर गेला. चार विजय आणि चार पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद आता दहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाचे अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले, त्यामुळे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना अतिआक्रमक खेळण्याची रणनीती चुकीची होती हे मान्य करण्यास भाग पाडले.